शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली गेहरांईया ही आजच्या काळातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची कहाणी आहे. दीपिकाच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतायत.
गेहरांईयाचे स्क्रिनिंग शुक्रवारी मुंबईत पार पडले. ज्यामध्ये दीपिका पदुकोण ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली होती. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
दीपिकाच्या ड्रेसबद्दल बोलायचे तर तिने डीप नेक, ब्लॅक आणि ब्राऊन कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. याबरोबरच तिने लाईट मेकअप केला होता आणि केस बांधले होते.
या फोटोंमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्क्रिनिंगपूर्वी दीपिकाने फोटोग्राफर्सना पोजही दिली.
गेहरांईयाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांतचे इंटीमेंट सीन्स पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे.