बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटातील अभिनयामुळे आणि तिच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते.



नुकताच सनीसोबत एक फ्रॉड झाला आहे.



सनीनं सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे.



'moneycontrol.com' च्या रिपोर्टनुसार, सनीनं एक ट्वीट शेअर करून सांगितलं की, तिच्या पॅन कार्डचा वापर करून एका व्यक्तीनं धनी अॅपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले.



सनीनं या ट्वीटमध्ये लिहिले की, तिची कोणीही मदत केली नाही आणि पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेतल्यामुळे तिचा CIBIL स्कोअर देखील कमी झाला.



नंतर सनीनं हे ट्वीट डिलीट केलं. सनीनं दुसरं ट्वीट शेअर करून त्यामध्ये मदत केल्याबद्दल इंडिया बुल्स सिक्यूरिटीजचे आभार मानले आहेत.



सनीनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'IVL सिक्यूरिटीज, ib होम लोन्स आणि CIBIL_Official यांचे मी आभार मानते. त्यांनी माझी मदत केली. '



गेल्या काही दिवसांत इंडियाबुल्स प्लॅटफॉर्म धनी अॅपवर अनेकांनी कर्जाच्या फसवणुकीबाबत तक्रार केली आहे.