बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे आलियानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलियाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. व्हाईट प्रिंटेड जॅकेट आणि शॉर्ट ड्रेस अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहेत. 'बाय बर्लिन' असं कॅप्शन आलियानं या फोटोला दिलं आहे. गंगूबाई काठियावाडी हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील आलियाचा डॅशिंग स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची आलियाचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.