धकधक गर्लच्या नव्या लूकची चर्चा बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. माधुरी आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. माधुरीच्या नव्या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्याच्या प्रमोशन निमित्ताने माधुरी तिचे वेगवेगळे लूक सध्या शेअर करतेय. निळ्या साडीत माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. माधुरीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.