कर्णधार विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने सेन्चुरियन मैदानात इतिहास रचला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 113 धावांनी मात देत पहिली कसोटी जिंकली आहे. सामन्यात सर्वच भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पहिल्यादांच सेन्चुरियन मैदानात आशिया खंडातील देश जिंकल्याने भारताचा हा विजय ऐतिहासिक ठरला. सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये भारताने दमदार कामगिरी केली. केएल राहुलचं शतक आणि शमीने घेतलेल्या 8 विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या. बुमराह, सिराज, शार्दुल आणि अश्विन यांचीही शमीला चांगली साथ आफ्रिकेकडून डी एल्गार याने 77 धावांची एकाकी झुंज या विजयासह तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी