न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमनं इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.



इंग्लंडचं माजी प्रशिक्षक सिल्व्हरवुड यांच्यानंतर तो प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहे, जे ऍशेसमध्ये संघाच्या अपयशानंतर पायउतार झाले होते.



इंग्लंडनं गेल्या काही वर्षांत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे आणि नवे प्रशिक्षक मॅक्युलम इंग्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून प्रेरणा घेण्यास उत्सुक आहेत.



प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमनं प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



त्यावेळी तो म्हणाला की, “पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडनं काय मिळवले आणि इऑन मॉर्गननं जे काही केले ते मी पाहिले आहे,मी बेन स्टोक्ससोबतही तेच करायला उत्सुक आहे.



इंग्लंडला नंबर वन बनवण्याचं माझं लक्ष्य आहे. यासाठी थोडा वेळ लागेल.- ब्रेंडन मॅक्युलम



पुढच्या ऍशेसपर्यंत इंग्लंडच्या संघाला मजबूत स्थितीत घेऊन जायचंय. - ब्रेंडन मॅक्युलम



मॅक्युलमला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव नाही.



यासाठी त्यांनं अँडी फ्लॉवर आणि ट्रेव्हर बेलिस यांच्याशी चर्चा केली आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणचे असूनही इंग्लंडची कोचिंग इको-सिस्टम समजतात.



ब्रेंडन मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.