'माझ्या नवऱ्याची बायको' फेम माया अर्थात रुचिरा जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं आहे. रुचिरा घराबाहेर पडल्याने आता रोहितचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये होते. यातून रुचिरा जाधवला घर सोडून जावे लागले. घर सोडल्यानंतर रुचिराने एक खास पोस्ट शेअर केली आहे. बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. रुचिरा जाधव 'बिग बॉस मराठी'चा खेळ खेळण्यात कमी पडली आहे. रुचिरा जाधव 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. रुचिरा जाधवचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कमध्ये रुचाराने अपूर्वाला गद्दार ठरवलं आहे.