मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी गुढीपाडवा साजरा केला.
राज ठाकरे या वेळी बाल्कनीत आपल्या नातवासोबत दिसले.
राज ठाकरे यांना नातवाला कडेवर घेत गुढीची पूजा केली
या वेळी पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि नातू किआन ठाकरे उपस्थित होते.
नेहमीच विरोधकांचा समाचार घेणाऱ्या राज ठाकरेंच्या नातू प्रेमाची मोठी चर्चा आहे.
किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती.
किआनचा पहिला गुढी पाडवा आहे. त्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण आहे.
आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी कधी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. तर कधी शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले.
मुंबईतील शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे.. राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा पहिला गुढीपाडवा मेळावा आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर ते कितपत टीका करतात, आणि उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.