मुंबईतील मालाड परिसरात आज (13 मार्च 2023) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली



मालाड पूर्वेत आप्पा पाडा येथील झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली आहे.



मालाड पूर्व मधील आनंदनगर परिसरात ही झोपडपट्टी आहे.



या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली.



अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.



या आगीमध्ये 15 ते 20 LPG गॅस सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे.



या आगीत एकाचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण बेपत्ता आहेत.



अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून जळालेल्या घरांमध्ये शोधमोहीम सुरू आहे



आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी घरातील गॅस सिलेंडरसह मोकळ्या मैदानात धाव घेतली.