ही घटना मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी घडली.
ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता.
त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली.
पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले.
त्यामुळे मोठा अपघात टळला आहे, ट्रॅक नक्की कशामुळे वाकला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
त्यानंतर मागून येणाऱ्या लोकललाही थांबवण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला.
त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.