जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर केमिकल टँकरचा भीषण अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाला. पुण्याहून मुंबईकडे जात असलेला एक केमिकलने भरलेला टँकर रस्त्यावरील एका विद्युत डीपीला धडकला. विद्युत डीपीला धडकल्यानंतर टँकर पडली झाला आणि त्याने पेट घेतला. यामध्ये टँकर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चालक आणि त्याच्या साथीदाराने टँकरमधून खाली उडी मारून आपले प्राण वाचवले. ही घटना आज सकाळी 5 वाजता घडली. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या केमिकल टँकरचा भीषण अरघात झाला. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केमिकलच्या टँकरला आग लागली. रायगड-खोपोलीजवळ जवळील महामार्गावर हा भीषण अपघात घडला.