बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या
घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी हरियाणातील फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती.
त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली.
हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून
तो 37 वर्षांचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की,आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या
पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती
आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.