महाकाय बॅनरखाली 70-80 वाहनं अडकली

मुंबईतील घाटकोपर परसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे.

वडाळ्यात टॉवर कोसळला!

वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घडली.

जोगेश्वरीत झाड कोसळलं

मुसळधार पावसात जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली.

चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप

ओवल मैदान , हाई कोर्ट , सेशन कोर्ट , मुंबई यूनिव्हर्सिटी राजाबाई टॉवर परिसरही धुळीत अडकला होता.

वाहतूक सेवा काही काळासाठी ठप्प

मुंबईत पडलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर देखील पाहायला मिळाला

वीज वाहिनीच्या टॉवरवर भडका, वीजपुरवठा खंडीत

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊ आग लागल्याची घटना घडलीय.

वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

घाटकोपर रमाबाई नगर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई मेट्रो ठप्प

एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली.

विमानसेवेवरही परिणाम

विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल

लोकलसेवा विस्कळीत

मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूकही बंद झाली आहे.