जम्मू-काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील धार्मिक स्थळे ही हाय अलर्टवर आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक मंदिरास धोका असल्याचे समाचार प्राप्त झाल्याने सुरक्षायंत्रणांनी मंदिरास अवगत केले आहे.

Image Source: ABP Network

या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात मंदिर परिसरात नारळ आणण्यास मनाई आहे.

Image Source: ABP Network

तसेच श्रीं ना फुले, हार, मिठाई इ. अर्पण करण्यास तात्पुरत्या स्वरूपात मनाई करण्यात आली आहे.

Image Source: ABP Network

हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे.

Image Source: ABP Network

तथापि दूर्वांची जुडी, जास्वंदीच फूल आणण्यास प्रत्यवाह नाही.

Image Source: ABP Network

त्यास अनुसरून याबाबत सहकार्य करण्याचे भाविकांना आवाहन करण्यात येत आहे.

Image Source: ABP Network

तसेच मंदिर परिसरातील फुलविक्रेत्या संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली.

Image Source: ABP Network

त्यांनी देखील देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

Image Source: ABP Network