स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील, असा वर्तवला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी 868.6 एमएम पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल.

पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल.

उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.

जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाची नोंद होईल.

जुलै महिन्यात 1023 टक्के पाऊस होईल तर 280.5 मिलीमीटर पावसाची नोंद होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 108 टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात 254.9 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो.

सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते. तर,167.9 मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.