रोज मुंबई लोकलमध्ये लाखों प्रवासी प्रवास करत असतात.
पण प्रवास करत असताना ते सर्व नियम पाळतात का?
जाणून घेऊयात मुंबई लोकलचे काही नियम.
धुम्रपान केल्यास शिक्षा रु. 100/- पर्यंत दंड आहे.
धोकादायक वस्तुसहित गाडीतून प्रवास करू नये.
अन्यथा त्या व्यक्तिस तीन वर्षे कैद अथवा रु.1000/- दंड अन्यथा दोन्हीही दंड होऊ शकतात.
अल्पवयीन विद्यार्थ्यांचे संरक्षण आपल्यावर अवलंबून आहे. कृपया त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी व त्यांची काळजी घ्यावी.
चालत्या गाडीच्या बाहेर डोकावणे धोक्याचे आहे.
योग्य तिकिटा शिवाय प्रवास करु नये. नाहीतर दंड आकारण्यात येऊ शकतं.
कृपया दरवाज्याजवळ जड सामान ठेवू नये. कृपया प्रवाशांना प्रथम उतरु द्यावे.