सजून धजून, गुलाबी अनारकली मतदानाला! बॉलिवूडनगरीत आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावत आहेत. गुलाबी अनारकली ड्रेसमध्ये मध्ये जान्हवी मतदानाला आल्याचं पाहायला मिळालं! अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. जान्हवी कपूरने वांद्रे येथील सेंट एन्स हायस्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेत्री जान्हवी कपूर देखील तिची आई श्रीदेवी इतकीच दिसायला सुंदर आहे. अवघ्या २७ वर्षांची ही अभिनेत्री इतक्या कमी कालावधीत करोडो रुपयांच्या संपत्तीची मालक बनली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जान्हवीचे नाव सामील झाले आहे. 2018 मध्ये बॉलिवूड डेब्यू करत पहिलाच हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले.