आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गणरायाची विधीवत स्थापना झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा आणि विधिवत पूजन आज करण्यात आले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नव्या उत्साहाचं आणि नवचैतन्य निर्माण करणारे वातावरण झाले आहे. विद्येची देवता गणराया चरणी मी प्रार्थना करतो की, आपला कृपा आशीर्वाद राज्यातील सर्व नागरिकांवर राहू दे. इथून पुढे देखील आम्ही सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी कायम असू. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.