एबीपी माझाने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत दाखवल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एबीपी माझाने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत दाखवल्यानंतर मुंबई पोलीस सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. एबीपीच्या मुलाखतीत गॅंगस्टर लॉरेन्स म्हणाला की, सलमानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. लॉरेन्स म्हणाला,सलमानने आमच्या समाजाची माफी मागावी. लॉरेन्स पुढे म्हणाला,सलमानला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत. सलमानच्या वडिलांना गेल्या काही महिन्यांपूर्वी एक पत्र मिळाले होते. त्यात सलमान खानचा सिद्धू मूसेवाला करुन टाकू असं लिहिलेलं होतं. सलमानच्या वडिलांना मिळालेलं पत्र लॉरेन्स बिश्नोईचं असल्याचा संशय पोलिसांना आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'किसी का भाई किसी की जान'नंतर सलमान 'टायगर 3' या सिनेमात झळकणार आहे.