अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोन वर्षांपूर्वी अलानाने परदेशी बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रेसोबत एंगेजमेंट केली होती. आता हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात अनन्या पांडेचा लूक खूप सुंदर दिसत होता. अनन्या गुलाबी आणि सिल्व्हर रंगाच्या लेहेंग्यात दिसली. या लूकमध्ये अनन्या खूप सुंदर दिसत आहे. अनन्याने केसांमध्ये मेसी पोनीटेल केले आहे. अनन्याचा हा लूक चाहत्यांना देखील खूप आवडले आहेत. चाहत्यांनी अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. अनन्याने यावेळी पापाराझींना विविध पोझ दिल्या.