मुक्ती मोहनने पती कुणाल ठाकूरसोबत 'Mini Moon' ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. 10 डिसेंबर 2023 रोजी मुक्तीने अभिनेता कुणाल ठाकूरशी लग्न केले. सध्या दोघेही दुबईत Mini Moon साजरा करत आहेत. मुक्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर Mini Moon चे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कुणाल आणि मुक्ती समुद्राच्या मध्यभागी बोटीवर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. मुक्तीने निळ्या रंगाचा ड्रेस घालून मिनिमल मेकअपने लूक पूर्ण केला आहे. तर कुणाल पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कुणालसाठी एक खास नोटही लिहिली आहे. या जोडप्याच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Photo credit : Instagram/@muktimohan)