शहनाझ गिल आजकाल तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्स आणि लूकमुळे सतत चर्चेत असते. 'बिग बॉस 13'मधून सर्वांची मने जिंकणाऱ्या शहनाझ गिलने आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले आहेत. शहनाझ गिलचे इन्स्टाग्रामवर 17.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. शहनाझ तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'आयरा -नुपूर' च्या रिसेप्शनसाठी शहनाझ गिलचा गोल्ड साडी लूक! शहनाझचा बोल्ड लूक तिच्या मिनिमल मेकअपने हायलाइट झाला. शहनाझने या लूकसाठी मिनिमम ज्वेलरी वापरली आहे. शहनाझ गिलने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. शहनाझचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.