बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी आयरा खान हिचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला.

3 जानेवारीला आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी रजिस्टर मॅरेज केलं.

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा 10 जानेवारी रोजी उदयपूर येथे विवाह झाला.

या जोडप्याने उदयपूरला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.

या जोडप्याचं ग्रँड रिसेप्शन 13 जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं.

आयरा आणि नुपूरचं रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडलं.

या ग्रँड रिसेप्शनला सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू आणि नेते मंडळींसह दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.

आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

आयरा आणि नुपूरचा मेहंदी आणि संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.