'शेर शिवराज' चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. त्या रहस्याभोवतीचा पडदा या ट्रेलर अनावरण सोहळयाच्या निमित्ताने उघडला. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नसल्याचे परखड विधान त्यांनी यावेळी केले. ‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज, तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री वर्षा उसगांवकर या ‘बडी बेगम’ साकारताना दिसणार आहेत.