अंबानींची बातच न्यारी! थाटात पार पडला श्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी लवकरच आई-बाबा होणार आहेत.
नुकताच श्लोकाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.
'नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा'चा उद्धाटन सोहळा गेल्या काही दिवसांपूर्वी दिमाखात पार पडला
या सोहळ्यात श्लोकाच्या बेबी बम्पने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं
आता श्लोकाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम तिच्या खास मैत्रिणींनी आयोजित केला होता.
या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
ईशा अंबानीनेदेखील कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
श्लोकाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमामध्ये तिच्या खास मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या
या कार्यक्रमादरम्यान श्लोकाने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता आणि डोक्यावर टियारा घातला होता.