जितेश शर्माने आतापर्यंत आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना भारावून टाकले आहे.
आतापर्यंत 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये त्याने 160.49 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा केल्या आहेत.
तिलक वर्माने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत 9 सामने खेळत दमदार कामगिरी केली आहे.
त्याने फलंदाजी करताना 158.38 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा केल्या.
जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 160.61 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत.
जयस्वालने या पर्वात 62 चौकार आणि 21 षट्कार मारले आहेत.
तुषार सध्या 19 विकेट्ससह स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये त्याने 21.79 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा स्टार स्पिनर गोलंदाज सुयश शर्मा त्याचा पहिला आयपीएलचे पर्व खेळत आहे.
सुयशने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये 25.80च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.