अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल यांचा लग्नसोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं. अभिनेता सुनील शेट्टीनं लेकीच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सुनीलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये माना शेट्टी आणि अथिया दिसत आहेत. तसेच अथियाचा भाऊ अहान शेट्टीनं देखील अथियाच्या विवाह सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये अथिया आणि अहान शेट्टीमधील बॉन्डिंग दिसत आहे अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि के.एल. राहुलनं खास लूक केला होता. अथियानं विवाह सोहळ्यात पिंक लेहंगा परिधान केला होता. तसेच तिनं स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके आणि बांगड्या या ज्वेलरी लग्नात परिधान केल्या होत्या. अथिया आणि के.एल. राहुल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.