मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. मृणालच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. मृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 24 मार्च रोजी मृणालने मुलीला जन्म दिला आहे. 'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकेच्या माध्यमातून मृणाल घराघरांत पोहोचली आहे. मृणालच्या मुलीचे नाव 'नूर्वी' असे आहे. मृणालच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 2016 साली नीरज पंडीत सोबत मृणाल लग्नबंधनात अडकली होती.