छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बर्फाच्छादित काश्मीर हे त्यांचे हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं होतं. आज मौनीने सूरजसोबतचे काही क्लिक शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येतंय. Valentine's Day चं निमित्त साधत मौनीने हे फोटो शेअर केले आहेत.