छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन हे स्मार्ट जोडी (Smart Jodi)या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंकितानं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत प्रेक्षकांना सांगितलं.

तिनं सांगितलं की तिचा इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नाही. तसेच ती म्हणली की,

माझ्याकडे टॅलेंट असूनही ते दाखवण्याची संधी मला मिळाली नाही.

मुलाखतीमध्ये अंकिता म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीही गॉडफादर नाही.

त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप कठिण होता. चित्रपटांमध्ये असणाऱ्या छोट्या भूमिकांबद्दल अंकिता म्हणाली,

चित्रपटामधील किती वेळाचा आहे? या गोष्टीचा फरक पडत नाही. फक्त भूमिका चांगली असणे गरजेचे आहे.

मणिकर्णिका, बाघी-3 या चित्रपटांमध्ये अंकितानं काम केलं.

तसेच पवित्र रिश्ता या मालिकेमधील अभिनयामुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली.