अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.



अभिनेत्री मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.



आता पुन्हा मौनीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.



यावेळी मौनी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.



या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक आणि गोल्डन अशी साडी नेसलेली दिसत आहे.



मौनीने रेड लिपस्टिक आणि मिनिमल मेकअप आणि लो बन हेअरस्टाईलसह तिचा लूक पूर्ण केला आहे.



अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे.



अभिनेत्री मौनी रॉयने अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मौनीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.



सध्या मौनी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.



'ब्रह्मास्त्र' चित्रपटात मौनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुनसारखे स्टार्सही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.