टीव्हीवरील लोकप्रिय नागिणीपासून बॉलिवूडपर्यंत आपली छाप पाडणारी मौनी रॉय नेहमीच तिच्या लूकमधून प्रसिद्धी मिळवते.

मौनीचा ट्रेडिशनल लूक असो की वेस्टर्न, तिच्या सौंदर्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतो.

मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत सुट्टीवर आहे.

आता तिने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

तिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते तिचे नेहमीप्रमाणे कौतुक करत आहेत.

फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्राच्या मध्यभागी एका जहाजावर दिसत आहे.

तिने पांढऱ्या रंगाचा थाई स्लिट स्ट्रेपी मॅक्सी ड्रेस घातला आहे.

न्यूड मेकअपमध्ये सनग्लासेससह पोज देताना मौनी रॉय अप्रतिम दिसत आहे.

नेहमीप्रमाणेच मौनीचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

चाहते कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अलीकडेच मौनीने पती सूरज नांबियारसोबतचे फोटो स्टाईलमध्ये शेअर केले आहेत.