आयपीएलमधील आजच्या 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने केवळ 134 धावांचे माफक आव्हान गुजरातला दिले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी करत एकहाती झुंज दिली. गुजरातकडून मोहम्मद शामीने चार षटाकत फक्त 19 धावा खर्च करत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने दोन षटकात फक्त आठ धावा खर्च केल्या. 134 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि गिल जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली. साहाने सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. चेन्नईच्या पाथिराना याने आज दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यावेळी साहा याने 57 चेंडूत नाबाद 67 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलं.