बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी ठरला आहे.
ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2022 मध्ये रणवीर सिंहची ब्रँड व्हॅल्यू 181.7 मिलियन डॉलर एवढी आहे. त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास 29.1 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी रणवीरचा 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
रणवीर हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे.
रणवीरचा चाहता वर्ग मोठा आहे.
रणवीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
रणवीर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
पद्मावत, बाजीराव मस्तानी या रणवीरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.