नरेंद्र मोदी स्टेडिअम तयार करण्यासाठी किती खर्च आला?



आज अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे.



हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जात आहे.



या स्टेडियमच्या उभारणीसाठी किती खर्च झाला आहे, हे जाणून घ्या.



भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे.



गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) च्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी 2020 मध्ये या स्टेडियमचं काम करण्यात आलं आहे.



गुजरात सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे उद्दिष्ट भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर उंचावणे हा आहे.



या स्टेडियममध्ये 1,32,000 प्रेक्षकांच्या आसनक्षमतेची व्यवस्था आहे.



अहमदाबादमधील हे स्टेडियम हे मोटेरा स्टेडियम नावानेही ओळखलं जातं.



हे मैदान 1982 मध्ये पूर्ण झालं. पण, त्यावेळी मैदानात केवळ 49 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती.



2015 साली पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी स्टेडियम पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला.



हे स्टेडिअम तयार करण्यासाठी सुमारे 800 कोटींचा खर्च आला आहे.