देशातील सर्वात प्रदूषित शहरं, दिल्लीची हवा सर्वात विषारी



भारतासह जगातील विविध शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.



देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक शहरांची हवा सध्या अत्यंत विषारी बनली आहे.



जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.



टॉप 5 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील तीन शहरे आहेत.



दिल्ली, मुंबई आणि कोलकाता हे सर्वात खराब हवामान असलेल्या जगातील 10 शहरांमध्ये आहेत.



या यादीत दिल्ली पहिल्या स्थानावर आहे.



पाकिस्तानचे लाहोर शहर दुसऱ्या स्थानावर आहे.



तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता आणि मुंबई चौथ्या क्रमाकांवर आहे.



स्विस ग्रुप IQair ने जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे.



स्विस ग्रुप IQair वायू प्रदूषणाच्या आधारे हवा गुणवत्ता निर्देशांक तयार करतो.



जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत बांगलादेशची राजधानी ढाका, इराकची राजधानी बगदाद, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता, कतारची राजधानी दोहा, चीनचे वुहान शहर यांचाही समावेश आहे.