मुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते. मुनमुन दत्ता छोट्या पडद्यावरील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ताची एकूण संपत्ती 14 कोटी आहे. मुनमुन एका एपिसोडसाठी 35-40 हजार मानधन घेते. मुनमुन दत्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मुनमुन दत्ता तिच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अभिनेता राज अनादकतसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मुनमुन दत्ताचा ‘ढोलिडा' गाण्यावर गरबा करतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. मुनमुन दत्ता बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे, पण तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधून खरी ओळख मिळाली आहे.