स्त्रीयांच्या जीवनात गजऱ्याचे फार मोठे महत्त्व आहे. शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजऱ्याचा वापर केला जातो. केसगळती, केस पांढरे होणे अशा समस्यांवर गजरा मदत करतो. केसातल्या गजऱ्याचा तो सुगंध स्त्रियांना दिवसभर ताजेतवाने ठेवतो. स्त्रियांच्या शरीरात संतुलन राखण्यास गजरा खूप मदत करतो. फुलांच्या गजऱ्यामुळे मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो. घामामुळे निर्माण होणारी केसांमधील दुर्गंधी गजऱ्याच्या सुगंधामुळे दूर होते. स्त्रियांच्या होणाऱ्या चिडचिडीवर गजरा रामबाण उपाय आहे. केसात गजरा माळल्याने स्त्रीयांचे सौंदर्य खुलते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.