मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल झाला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर हिरवी शाल पांघरतात तर नद्या दुथडी भरुन वाहतात.
अशा वातावरणामध्ये गरमगरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. यंदा पावसाळ्यात ही मराठी गाणी तुम्ही ऐकू शकता.
अधीर मन झाले हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे.
निळकंठ मास्तर चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री पूजा सावंतनं नृत्य केलं आहे. या गाण्याचे संगीतकार अजय-अतुल हे आहेत.
बांध प्रेमाचे या चित्रपटातील चिंब भिजलेले हे गाणं प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि गायिका प्रिती कामथ यांनी गायलं आहे. या गाण्याचे गीतकार प्रवीण दवणे आहेत. तर या गाण्याला संगीत अजय-अतूल यांनी दिले आहे.
इरादा पक्का या चित्रपटातील भिजून गेला वारा हे गाणं क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी गायलं आहे. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांची केमिस्ट्री बघायला मिळते.
चिंब पावसानं झालं रान आबादानी हे सर्जा चित्रपटातील गाणे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार ना. धों. महानोर हे असून संगीतकार पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर हे आहेत. हे गाणे देखील तुम्ही पावसाळ्यामध्ये ऐकू शकता
मुंबई – पुणे – मुंबई या चित्रपटातील कधी तू रिमझिम झरणारी बरसात हे गाणं देखील अनेकांना आवडतं. हे गाणं ह्रिषिकेष रानडे यांनी गायलं आहे.
संदीप खरे आणि सलील कुळकर्णी यांचे ‘अग्गो बाई ढग्गो बई’ हे पावसावर आधारित बालगीत बच्चे कंपनीला नक्कीच आवडते.