दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि इरफाननं एकदाही एकत्र काम केलं नाही.
पत्रकार-लेखिका शुभ्रा गुप्ता यांच्या इरफान: लाइफ इन मूव्हीज या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत, करण जोहरने सांगितले की, 'इरफानला मी कधीही चित्रपट ऑफर करू शकलो नाही कारण, मी त्याला ऑफर करु शकेल अशा माझ्याकडे असणाऱ्या चित्रपटांपेक्षा त्याचा अभिनय अतिशय स्ट्राँग होता.'
पुढे करण म्हणाला, इरफानचा अभिनय हा अतिशय स्ट्राँग होता. माझ्याकडे अशी पटकथा, असा चित्रपट नव्हता जो इरफानला त्याचा सुंदर अभिनय दाखवण्याची संधी देईल. ;
म्हणूनच मी इरफानसोबत कधीच चित्रपट केला नाही कारण मला तो चित्रपट निर्माता व्हायचं नव्हतं ज्याने त्याला एक निकृष्ट मेन स्ट्रीम चित्रपट दिला. मला त्याच्या करिअरच्या सुंदर आलेखावरील डाग व्हायचे नव्हते. असंही करणनं सांगितलं.
'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'ए दिल हाल मुश्कील' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या करण जोहरनं आहे,.
करणनं इरफान आणि श्रीदेवी यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याची संधी न मिळाल्यानं खंत देखील व्यक्त केली.
लवकरच करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
करणच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
करण हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
करणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.