मोमोज खाताय? सावधान.., डायबेटिस, कोलेस्टोरॉल आणि 'या' गंभीर आजारांची शक्यता
मोमोजमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मोमोज खायला सॉफ्ट व्हावेत यासाठी त्याच्या मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो
पण या स्टार्चमुळे आपल्या पोटाचा घेर मात्र वाढण्याची जास्त शक्यता आहे. त्याचसोबत मोमोज खाल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉल आणि ब्लड ट्रायग्लिसराईड म्हणजे बॅड कोलेस्टोरॉलची वाढ अधिक होते
मोमोजला सॉफ्ट बनवण्यासाठी त्याच्या मैद्यामध्ये अॅजोडिकार्बोनामाईड आणि बेझॉईल पॅरॉक्साईडचा वापर केला जातो.
मोमोजच्या आतमध्ये भाज्या आणि चिकनचा वापर केला जातो. मग ते मोमोज जास्त कालावधीसाठी ठेवल्यास मात्र खराब होऊ शकतात.
अनेकांना मोमोजसोबत तिखट चटणी खायला आवडते. परंतु ही तिखट चटणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकते.
मोमोजमध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅजोडिकार्बोनामाईड आणि बेझॉईल पॅरॉक्साईडमुळे आपल्या शरीरातील पॅनक्रिजला धोका पोहोचू शकतो
त्यामुळे इन्शुलिन हार्मोनचे सिक्रेशन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे डायबेटिसचा धोका वाढू शकतो
मोमोजचे अधिक सेवन केल्यास डायबेटिसचा धोका वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने अधिक असते.
जच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना प्रत्येक गोष्टीची घाई असते. काम असेल वा खाणं, सगळ्या गोष्टी सुपरफास्ट झाल्याचं दिसून येतंय