हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप या समस्या अनेकांना जाणवतात.


हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काही पदार्थांचा समावेश आहारात करावा लागेल.


तुम्ही आहारात बाजरी, नाचणी यांपासून तयार करण्यात आलेल्या भाकरीचा समावेश करु शकता. बाजरी आणि नाचणीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आहेत.


हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुम्ही आहारात करु शकता.


डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हे लाडू हिवाळ्यात खाल्यानं इम्युनिटी सिस्टिम स्ट्राँग होते.


हिवाळ्यात चहामध्ये तुम्ही तुळस, वेलची, लवंग किंवा दालचिनी इत्यादी घालू शकता. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.


हिवाळ्यात शरीराला सतत हायड्रेट ठेवा. जास्त पाणी प्यायल्यानं वात, पित्त होणे किंवा कफ होणे या समस्या जाणवत नाहीत.


हिवाळ्यात तूप खाणे खूप फायदेशीर आहे. तुपात आढळणारे हेल्दी फॅट हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवतात, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो.


हिवाळ्यात कांदा आपल्या शरीराला ऊब देतो.


कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यात कच्च्या कांद्याचे पराठे आणि कांदा कचोरी खाऊ शकता.