वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा धुव्वा उडवलाय

न्यूझीलंडला हरवत टीम इंडियानं फायनल्समध्ये थाटात प्रवेश केलाय

किवी संघाविरोधातील विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शामीलाच जातं

शामीच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी संघाच्या प्रमुख फलंदाजांनी गुडघे टेकले

न्यूझीलंडच्या एक नाही, दोन नाही, तीन नाही तर सात गोलंदाजांना शामीनं माघारी धाडलं

शामीनं न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र, डेवॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरील मिचेल अन् टॉम लॅथम या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडत विजयी पताका फडकावली.

त्यामुळेच शामी टीम इंडियाचा हुकुमी एक्का नाही, तर हुकुमी सत्ता आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही

न्यूझीलंडविरोधातील धमाकेदार कामगिरीनंतर मी संधीची वाट पाहत होतो असं मत व्यक्त केलं आहे.

शामीनं आपल्या भेदक माऱ्यानं किवी संघाच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली

टीम इंडियानं वर्ल्डकपच्या सामन्यात आजपर्यंत झालेले सगळे सामने जिंकलेत

आता दुसऱ्या सेमीफायनमध्ये जिंकणाऱ्या संघासोबत टीम इंडिया फायनलमध्ये भिडणार आहे.