पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत संपुष्टात आली आहे. शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलेय आयसीसी क्रमवारीत बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर अव्वलस्थानी होता. बाबर आझमला विश्वचषकात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही एकीकडे शुबमनच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला, तर बाबर धावा करताना संघर्ष करताना दिसला. बाबर आझमचे रेटिंग गुण 824 इतके आहेत. बाबर आझम आणि शुभमन गिल यांच्यामध्ये सहा रेटिंग गुणांचा फरक आहे. बाबर आझम 950 दिवस पहिल्या स्थानावर विराजमान होता. विश्वचषकातील बाबरच्या कामगिरीवर आणि नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले