सर्वाधिक काळ ICC च्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेला फलंदाज.

सर्वाधिक काळ आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेला फलंदाज वेस्ट इंडिजचा विव्ह रिचर्ड्स आहे,त्याने १७४८ दिवस हे स्थान सांभाळले.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या मायकेल बेवनचा क्रमांक लागतो. तो 1259 दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला.

या बाबतीत विराट कोहलीचा क्रमांक तिसरा आहे.कोहली 1258 दिवस आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे.

ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स 1146 दिवस आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.

वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा 1049 दिवस आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज राहिला.

बाबर आझम 951 दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिला, मात्र आता भारताच्या शुभमन गिलने त्याला मागे टाकले आहे.

शुभमन गिल आता आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. यावेळी त्याचे रेटिंग 830 पर्यंत वाढले आहे, तर बाबर आझमचे रेटिंग 824 आहे.

ग्लेन मॅक्सवेल हा एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे.