टीम इंडिया वर्ल्डकप 2023 मध्ये धडाकेबाज कामगिरी करतेय

मोहम्मद शामी, विराट कोहली सोडा कालच्या सामन्यात रोहित शर्मानंही एक रेकॉर्ड आपल्या नावे केलाय

यंदाच्या वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या सामन्यापासून रोहित आपल्या बॅटनं सर्वांनाच हैराण करतोय

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहितनं 29 चेंडूत 47 धावांची धमाकेदार खेळी केली

आपल्या संपूर्ण खेळीत रोहितनं 4 चौकार अन् 4 षटकार ठोकले

रोहितला रोखताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तोंडाला फेस यायचाच बाकी होता

न्यूझीलंडविरुद्ध 4 षटकार ठोकत रोहित शर्मा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरलाय

वेस्ट इंडिजचं वादळ असलेल्या क्रिस गेलच्या नावावर वर्ल्डकपमधील सर्वाधिक 49 षटकार लगावण्याचा विक्रम आहे

रोहितनं क्रिस गेललाही मागे टाकलंय आणि वर्ल्डकपमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावे केलाय

रोहितनं रेकॉर्ड मोडला आणि वानखेडेवर चक्क सोहळाच साजरा झाला.

रोहित एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं वर्ल्डकपच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार लगावण्याचा रेकॉर्डही आपल्या नावे केलाय