'स्कॅम 1992' ही वेबसीरिज प्रचंड लोकप्रिय ठरली. यामध्ये महिला पत्रकाराची भूमिका श्रेया धनवंत्रीने साकारली होती सोशल मीडियावर श्रेयाने पोस्ट केलेल्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. हे फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असले तरी बोल्ड आहेत. श्रेयाने सिंपल व्हाईट शर्ट घातला आहे. ब्लॅक पँटसोबत टीमअप केला आहे. केसांना मोकळे सोडले असून नो मेकअप लुक ठेवला आहे. या बोल्ड फोटोमुळे श्रेया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. तर, काहींनी याची तुला गरज काय असा सवाल केलाय. काहींनी भूमिकेत सोज्जवळ दिसते आणि प्रत्यक्षात ग्लॅमरस दिसतेस असे म्हटले. श्रेयाने फॅमिली मॅन, मुंबई डायरिज 26/11 या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.