अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण! अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. 'कारवां' फेम अभिनेत्री मिथिला पालकरने सांगितले की, तिच्या वाढदिवसापूर्वीच तिला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये असून स्वतःची काळजी घेत आहे. मिथिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ''मी माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात कोरोनाची लागण होऊन झाली आहे. मला सौम्य लक्षणे होती. मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मी खूप सावधगिरी बाळगते. विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात येण्यापासून टाळत आहे. तुम्ही मास्क घाला आणि सुरक्षित रहा.'' याआधी अनेक स्टार्स कोरोनाने ग्रासले आहेत.