रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते.



जेनेलिया आणि रितेशचे सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात.



रितेश आणि जेनेलिया यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली. त्यांनी 'मिस्टर मम्मी' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.



'मिस्टर मम्मी' या रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटाची निर्मीती भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत यांनी केली आहे.



चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे.



चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया हे दोघेही प्रेग्नंट दिसत आहेत.



मिस्टर मम्मी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून जेनेलियानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'पोट दुखेपर्यंत हसण्यासाठी तयार व्हा. कधीही न पाहिलेली कथा लवकरच तुमच्या भेटीस येत आहे.'



जेनेलिया आणि रितेश यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली.