90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींचं नावं घेतली तर त्यातील एक आघाडीचं नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर. प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालेल्या अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकर यांचा समावेश होतो. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. 4 फेब्रुवारी 1974 मध्ये उर्मिला मातोंडकरचा जन्म झाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. उर्मिलाचे शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण झाले. उर्मिलाची 'मासूम' चित्रपटातील भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपटातील तिचं 'लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा' गाणही आजही सर्वाचं आवडतं आहे. 1991 मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी उर्मिला यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं. रंगीला चित्रपटामुळे उर्मिलाला खूप प्रसिद्धी मिळाली. (photo instgrammed by: urmilamatondkarofficial) (photo instgrammed by: urmilamatondkarofficial)